सुप्रीम कोर्टाने फेटाळली फेरीवाल्यांची याचिका

sanjay-nirupam

नवी दिल्ली : फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून मनसेविरोधात आक्रमक भूमिका घेणारे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम तोंडघशी पडले आहेत कारण निरुपम यांनी फेरीवाल्यांसाठी दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.हायकोर्टाने दिलेला निर्णय स्पष्ट आहे. यामध्येच फेरीवाल्यांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे, असं स्पष्ट करत सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली. हायकोर्टाने फेरीवाल्यांबाबत दिलेल्या निर्णयाविरोधात संजय निरुपम यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.फेरीवाल्यांसाठी पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय त्यांना हटवू नये, अशी याचिका निरुपमांनी केली होती.