गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : कायद्यानुसार गर्भधारणेपासून काही आठवड्यापर्यंतच गर्भपात केला जाऊ शकतो. पण सर्वोच्च न्यायालयाने पुण्यातील एका महिलेला २४ आठवड्याचा गर्भपात करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे या महिलेचा गर्भपात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

न्यायमूर्ती एस.ए बोबडे  आणि न्यायमूर्ती एल नागेश्वरराव यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. पुण्यामधील बी जे मेडीकल कॉलेज च्या तज्ञांद्वारे जो रिपोर्ट देण्यात आला होता त्या रिपोर्ट च्या आधारे या वीस वर्षीय महिलेला गर्भपात करण्याची परवानगी देण्यात आली आहे. गर्भाची पूर्ण वाढ न झाल्यामुळे हे अर्भक जन्मानंतर जिवंत राहण्याची शक्यता नसल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. या अर्भकाच्या कवटीची वाढ न झाल्याचे डॉक्टरांच्या रिपोर्टवरून सिद्ध झाल्याने कोर्टाने हा निर्णय दिला आहे.