बलात्कारानंतर पीडित महिला ‘आय लव्ह यू’, म्हणेल का?

peepli live director

टीम महाराष्ट्र देशा- बलात्काराचा आरोप असलेल्या ‘पीपली लाइव्ह’ चित्रपटाचे सह दिग्दर्शक महमूद फारूखी यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. फारूखी यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेने हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. शुक्रवारी न्यायाधीश एस. ए. बोबडे आणि न्यायाधीश एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने पहिल्याच सुनावणीत हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावत रिलेशनशीपमधील महिलेने केलेल्या बलात्काराच्या आरोपानंतर यावर निर्णय देणे कठिण काम होते, असे सांगत हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाचे सुप्रीम कोर्टाने कौतुक केले.

अॅड. वृंदा ग्रोवर आणि अनिंदिता पुजारी यांनी पीडित महिलेची बाजु मांडली. पीडित महिला व दिग्दर्शक हे केवळ परिचित होते त्यांच्यात कोणतेही संबंध नव्हते. तसेच या प्रकरणात आरोपीला ७ वर्षाची शिक्षा ट्रायल कोर्टाने ठोठावली आहे, याकडेही पीडित महिलेच्या वकिलांनी खंडपीठाचे लक्ष वेधले.खंडपीठाने पहिल्याच सुनावणीत हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावत महमूद फारूखी यांना कोर्टाने मोठा दिलासा दिला .

Loading...

काय म्हणणे आहे सुप्रीम कोर्टाचे ?

महमूद फारूखी यांच्या प्रकरणात पीडित महिलेवर जबरदस्ती केल्याचा कोणताही पुरावा दिसत नाही. पीडित मुलीच्या ईमेलचे उदाहरण देत बलात्कारानंतर कोणतीही पीडित महिला ‘आय लव्ह यू’, म्हणेल का?, असा सवालही सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठानं पीडितेच्या वकिलाला विचारला. तुम्ही ज्येष्ठ वकील आहात आणि बलात्काराचे बरीच प्रकरणे तुम्ही हाताळली आहेत. बलात्कारानंतर किती पीडित व्यक्तीनं आरोपीला ‘आय लव्ह यू’ म्हटलेय, हे तुम्हीच सांगा, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने पीडितेच्या वकिलांना खडसावले. दोघांची चर्चा आणि त्यांच्या ईमेलवरून हे दोघेही चांगले मित्र होते, असं दिसतंय असं सुप्रीम कोर्टानं नमूद करीत ही याचिका फेटाळून लावली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
'हिंसक वळण लावणारे, तोडफोड करणारे कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीचे नाहीत'
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
...तर भाजप - मनसे एकत्र येऊ शकतात; पाटलांनी दिले युतीचे संकेत
'एमआयएम'ने आजपर्यंत सगळ्यांनाच शिंगावर घेतलयं, मनसेला घाबरत नाही
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
मनसेच्या संघटना बांधणीची जबाबदारी बारामतीकराच्या खांद्यावर
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'