केंद्रीय विद्यालयांमधून हिंदुत्वाचा अजेंडा राबवला जातोय का?

SupremeCourt

नवी दिल्ली :केंद्रीय विद्यालयांमधून हिंदुत्वाचा अजेंडा राबवला जातोय का? असा सवाल सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला विचारला आहे. केंद्रीय विद्यालयांमधून हिंदू धर्माला प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप करणारी एक जनहित याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनवणीदरम्यान कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली आहे. यात हा प्रश्न विचारण्यात आला आहे .

काय म्हटलं आहे जनहित याचिकेत ?
एका वकिलांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे. या विकिलाची मुले केंद्रीय विद्यालयातून शिक्षण घेत आहेत. याचिकाकर्त्या वकिलांनी म्हटले आहे की, ही बाब घटनेच्या कलम २५ आणि २८ च्या विरोधात आहे. याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. कायद्यानुसार, राज्यांच्या महसुलावर चालणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये कोणत्याच धर्माला प्रोत्साहन दिले जाऊ शकत नाही.

या प्रकरणावर केंद्राकडून उत्तर मागवताना सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं आहे ?

ही एक गंभीर संविधानिक बाब आहे. देशभरात ११०० केंद्रीय विद्यालयांमध्ये हिंदी प्रार्थना एका विशिष्ट धर्माला प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे हा प्रकार घटनेचे उल्लंघन करणारा आहे का?देशभरातील केंद्रीय विद्यालयांमध्ये दररोज घेतल्या जाणाऱ्या हिंदी प्रार्थनेद्वारे हिंदू धर्माला प्रोत्साहन दिले जात आहे. सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या शाळांमध्ये असा प्रकार होता कामा नये.Loading…
Loading...