अंतिम सुनावणीपर्यंत पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवा – सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : एससी/एसटी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नतीसाठी दिलं जाणारं आरक्षण कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सरकारी नोकरीमध्ये पदोन्नतीसाठी दिलं जाणारं आरक्षण रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने 4 ऑगस्ट 2017 रोजी सुनावला होता. मात्र आता घटनापीठ या मुद्द्यावर अंतिम निर्णय घेत नाही, तोपर्यंत सरकार पदोन्नतीमध्ये आरक्षण देऊ शकतं, असं सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला सांगितलं आहे.

सुप्रीम कोर्टात सरकारची बाजू मांडणारे एएसजी मनिंदर सिंह याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले की, “कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणं ही सरकारची जबाबदारी आहे. देशातील विविध उच्च न्यायालयाच्या निर्णयांमुळे ही पदोन्नती थांबली होती.” सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय देताना, सर्व प्रकरणं एकत्र केली आणि याची सुनावणी घटनापीठ करणार आहे.

You might also like
Comments
Loading...