fbpx

‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ चे डेबिट कार्ड बंद होणार

टीम महाराष्ट्र देशा :-डेबिट कार्ड येत्या पाच वर्षांमध्ये बंद होणार आहे. डेबिट कार्ड बंद करण्याचा विचार ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ करत आहे. सर्व आर्थिक व्यवहार डिजीटल व्हावे या दृष्टीकोनातून एसबीआय हे पाऊल उचलणार असल्याची माहिती ‘स्टेट बँक ऑफ इंडियाचे’ संचालक रजनीश कुमार यांच्याकडून देण्यात आली आहे. यामुळे डिजीटल पेमेंट करण्याला गती मिळू शकते.

सध्या देशभरात 90 कोटी डेबिट कार्ड आणि 3 कोटी क्रेडिट कार्ड धारक आहेत. हे प्लास्टिक कार्ड पूर्णपणे बंद होऊन सर्व आर्थिक व्यवहार डिजीटल ट्रान्झॅक्शन्स आणि क्युआरकोडच्या माध्यमातून होण्यासाठी हा निर्णय घेणार असल्याचे कुमार म्हणाले आहे. एसबीआयच्या देशभरातील अनेक एटीएम्समध्ये ‘योनो’ सुविधा देण्यात आली आहे.

या सुविधेमुळे फक्त मोबाइलच्या साहाय्याने पैसे काढता येणे शक्य आहे. तसंच खरेदी-विक्रीचे व्यवहारही योनोच्या साहाय्याने करता सहज करता येऊ शकतात. तसंच योनोच्या मदतीने खरेदी विक्रीचे व्यवहारही करता येतात. बँकेच्या ग्राहकांनी योनो सुविधेचा पुरेपूर वापर केला तर डेबिट कार्डची गरजच उरणार नाही. सध्या देशात ६८,००० योनो सुविधा देणारे एटीएम आहे. पुढील १८ महिन्यां ही संख्या १० लाखांवर नेण्याचा स्टेट बँकेचे उद्धिष्ट आहे.