एसबीआय नोकरभरती, १० तारखेपर्यंत भरा अर्ज

एसबीआय नोकरभरती

वेब टीम- स्टेट बँकेत सध्या नोकरभरतीची प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्रासाठी लिपिक पदाच्या ७५० जागा निघाल्या आहेत. यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत १० फेब्रुवारी आहे. कोणत्याही शाखेचा पदवीधर या अर्ज करू शकतो. ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी बँकेचे स्टाफ युनियन मार्गदर्शन करणार आहे, अशी माहिती युनियनच्या मुंबई सर्कलचे उपमहासचिव अजय बागेवाडी यांनी दिली. पूर्वपरीक्षा मार्च-एप्रिल व मुख्य परीक्षा मे महिन्यात होणार आहे.Loading…


Loading…

Loading...