एसबीआयचा ठेवीदारांना सुखद धक्का !

टीम महाराष्ट्र देशा : देशाची सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने मुदत ठेवीदारांना गुरुवारी सुखद धक्का दिला. बँकेने एक कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या रिटेल किंवा किरकोळ मुदत ठेवींवरील तसेच एक कोटींपेक्षा अधिक रकमेच्या घाऊक ठेवींवरील व्याजदर पाऊण टक्क्यांपर्यंत वाढवले. नवे ठेवीदर तत्काळ लागू करण्यात आले आहेत. यापैकी एक कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या रिटेल किंवा किरकोळ ठेवींवर अर्धा टक्का (०.५० टक्के) अधिक व्याज मिळणार आहे.

१० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या घाऊक ठेवी, ज्यांची मुदत एक वर्ष ते दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत पूर्ण होत आहे, अशा ठेवींसाठी आता अर्धा टक्का (०.५०) अधिक व्याज मिळणार आहे. त्यामुळे या ठेवींचा नवा दर ६.७५ टक्के झाला आहे.

You might also like
Comments
Loading...