एसबीआय मध्ये 8,653 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिध्द ; आजचंं करा अर्ज

टीम महाराष्ट्र देशा : स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने देशातील 8,653 रिक्त लिपिक पदांसाठी जाहिरात प्रसिध्द केली आहे. शुक्रवार, 12 एप्रिल रोजी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून 3 मे 2019 (शुक्रवार) पर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येतील. बँकेतील सरकारी नोकरी करणे हे अनेकांचे स्वप्न असते. त्यापैकीच तुम्ही देखील असाल तर स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) मध्ये क्लार्क पदासाठी अर्ज करू शकता. तब्बल 8,653 रिक्त पदांसाठी एसबीआय मध्ये भर्ती केली जाणार आहे. यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

 • पदाचे नाव आणि संख्या
  जूनियर असोसिएट्स (कस्टमर सपोर्ट अँड सेल्स) 8,500 हून अधिक पदांसाठी अर्ज स्वीकारले जातील.
 • शैक्षणिक पात्रता
  – मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेत किंवा केंद्र सरकारद्वारा मान्यताप्राप्त पात्रता असलेल्या कोणत्याही शैक्षणिक अभ्यासातील पदवी असणे आवश्यक आहे.
  – जे विद्यार्थी त्यांच्या पदवीच्या अंतिम वर्षाच्या / सेमीस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात. त्यांची निवड झाल्यास त्यांना 31.08.2019 रोजी किंवा त्यापूर्वी ग्रॅज्युएशन परीक्षा उत्तीर्ण होण्याचा पुरावा देणे आवश्यक आहे.
 • वयोमर्यादा
  01.04.2019 रोजी अर्जदार 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावा.

महत्वाच्या तारखा
अर्ज करण्याची तारीख : 12एप्रिल 201 9
अर्ज करण्याची शेवटची तारीखः 3 मे 201 9
अर्ज प्रिंट करण्याची शेवटची तारीखः 18 मे 201 9
प्रारंभिक परीक्षेची तारीख (टेंटेटिव्ह): जून 201 9
प्रवेश पत्र डाउनलोड करण्याची तारीख (प्राथमिक परीक्षा): जून २०१९ च्या पहिल्या आठवड्यापासून
प्रवेश पत्र डाउनलोड करण्याची तारीख (मुख्य परीक्षा): जुलै 2019 च्या चौथ्या आठवड्यापासून
मुख्य परीक्षेची तारीख (टेंटिव्ह): 10 ऑगस्ट 2019