मिनिमम बॅलन्सची अट एसबीआयने केली शिथील

sbi

वेब टीम:- भारतीय स्टेट बँकेत खातेदार असणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची व दिलासादायक बातमी आहे. खात्यामधील बॅलन्स कमी झाला तर पैसे कट होण्याच्या अनेक तक्रारी आपण रोजच ऐकत असतोत पण आता दिलासादायक माहिती एसबीआयने आपल्या खातेदारांना दिली आहे. एसबीआयच्या खात्यात मासिक मिनिमम बॅलन्स ठेवन्याच्या रक्कमेत तब्बल २००० रूपयांनी कपात केली आहे. त्यामुळे खात्यात आता मासिक मिनिमम बॅलेन्स ३००० रुपये असले तरीपन तुमच्या खात्यातून अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.

या आधी शहरी भागांमधे एसबीआय मधे मिनिमम बॅलेन्स ५००० रूपये ठेवण्याची मर्यादा होती यापेक्षा कमी बॅलेन्स असल्यास १०० रुपये अतिरिक्त शुल्क आकारण्यत येत असे त्यामुळे खातेदारांचे गारहाणे रोजचेच असत. आता मिनिमम बॅलेन्सची मर्यादा ५००० रुपये वरुन ३००० रुपये पर्यंत करण्यात आली आहे. पंतप्रधान जन-धन योजने मधील खातेदारांना या नियमातुन मात्र वगळंन्यात आले आहे.