fbpx

आगामी विधानसभा निवडणूक ही राज ठाकरेंना सुवर्णसंधी, मात्र… – प्रकाश आंबेडकर

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणूक ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी सुवर्णसंधी आहे. परंतु त्यांनी ही संधी साधली नाही तर अशी संधी त्यांना परत कधीही मिळणार नाही. असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली, राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. विधानसभा निवडणुका आवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे. वंचित बहुजन आघाडी लोकसभा निवडणुकीत ज्या ताकतीने उतरली होती त्याच ताकतीने विधानसभा निवडणुकीतही उतरणार आहे. असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीसाठी आगामी रणनीती ७ जून रोजी स्पष्ट करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

याचदरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही भाष्य केले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. शिवसेना १३५ आणि भाजपाचे मित्र पक्ष १५३ जागांवर लढणार आहेत. लोकसभा निवडणुकी शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले असले, तरी शिवसेना कोमात आहे. शिवसेना आणि मनसे यांना मतदान करणाऱ्यांची मानसिकता सारखी आहे त्यामुळे ज्या जागांवर शिवसेनेचे उमेदवार लढणार नाहीत, त्या जागांवर मनसे आपली ताकद पणाला लावून शिवसेनेची मते ‘कॅश’ करू शकतात. असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

मनसेला पुनरागमन करण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. मात्र, राज ठाकरेंनी ही संधी साधली नाही तर अशी सुवर्णसंधी त्यांना परत कधीही मिळणार नाही. असेही त्यांनी म्हंटले.