कामावर दुपारीच का येत नाही असे म्हणत, हॉटेल मालकाचा नौकारावर चॉपरने वार

औरंगाबाद : कामावर दुपारीच का येत नाही असे म्हणत हॉटेल मालकाने नोकरावर चॉपरने वार केला. ही घटना गुरुवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास चिकलठाणा भागात घडली. धनराज रामगिर गिरी (४७, रा. मुकुंदनगर, मुकुंदवाडी) असे जखमी झालेल्या नौकाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, गिरी यांना हॉटेल मालक गणेश सानप (रा. गारखेडा परिसर) याने कामावर दुपारी एक वाजता का येत नाही, असा जाब विचारला. त्यावर धनराज यांनी पगाराच्या हिशोबानुसार कामावर दुपारी तीन वाजता येईल असे सानप याला सांगितले.

गिरी यांनी उलट उत्तर दिल्याचा राग आलेल्या हॉटेल मालक सानप याने गिरी यांना ढकलत हॉटेलच्या गार्डनमध्ये नेऊन त्यांच्यावर चॉपरने वार केला. त्यावरुन एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या