‘अल्लाह के रास्ते से भटक गई थी’…असे म्हणत, बॉलीवूडला अलविदा केलेल्या झायराने चाहत्यांना केली विनंती

zahira vasim

मुंबई : खूप कमी वयातच झायरा वसीम प्रसिद्ध झाली होती. तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. अल्लाह के रास्ते से भटक गई थी… असे म्हणत बॉलिवूड अभिनेत्री झायरा वसीमने बॉलिवूड सोडले होते. यानंतर बॉलिवूडची अभिनेत्री सना खान हिने देखील ‘अल्लाह’साठी अभिनय सोडला होता.

दरम्यान झायराने एक पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये तिने सर्वप्रथम चाहत्यांचे आभार मानले आहेत. ती लिहिते, ‘तुमच्या निरंतर प्रेमासाठी आभार. तुम्ही माझी ताकद आहात. प्रत्येक गोष्टीत मला सोबत केल्याबद्दल तुमचे आभार. मी विनंती करते की, कृपया तुमच्या अकाऊंटचे माझे फोटो डिलीट करा आणि दुस-या फॅन पेजेसलाही माझे फोटो डिलीट करण्यास सांगा. इंटरनेटवरून माझे सर्व फोटो हटविणे अशक्य आहे. त्यामुळे किमान माझ्या फॅन पेजला तरी मी फोटो डिलीट करण्याची विनंती करू शकते. मी आयुष्याचा एक नवा चॅप्टर सुरु करतेय. यामुळे मला मदत मिळेल.’

झायरा वसीमने ‘दंगल’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘दंगल’ हा सिनेमा हिट देखील ठरला होता. झायराच्या या सिनेमामधील अभिनयाने सर्वांचे मन जिंकले होते. या चित्रपटनानंतर झायराला बॉलीवूडमधून बऱ्याच ऑफर देखील मिळाल्या पण झायराने बॉलीवूड सोडण्याचा निर्णय घेतला. झायरा वसीमचा ‘द स्काय इज पिंक’ हा शेवटचा सिनेमा या नंतर झायराने बॉलीवूडला कायमचेच अलविदा केले.

महत्वाच्या बातम्या