‘हा प्रश्न मला विचारू नका’ म्हणत चालू मुलाखतीतून माईक फेकून मलिक निघून गेले

मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचारावर महाविकास आघाडीने सोमवारी राज्यव्यापी बंद पुकारला होता. यावेळी राज्यातील सर्वच ठिकाणी बंद पाळण्यात आला. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते यांनीही बंदबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी एका खाजगी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीदरम्यान नवाब मलिक यांना आपला राग अनावर झाला आणि ते चालू मुलाखतीतून निघून गेले.

आम्ही शेतकऱ्यांना निर्दयपणे मारण्याच्या कल्पनेच्या विरोधात उभे आहोत असे मलिक म्हणाले. यावेळी अँकरने तुम्ही जबरदस्तीने दुकाने बंद करू शकत नाही असे म्हटले. त्यावर मलिक यांनी तुम्हाला असे वाटते की हे जबरदस्तीने आहे, तुम्ही निवडक रेकॉर्डिंग दाखवा आमची हरकत नाही, असे मलिक म्हणाले.

त्यावर अँकरने विचारले की, तुम्हाला महाराष्ट्र बंदमधून काय मिळाले? त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मलिक म्हणाले की, महाराष्ट्रातील जनता त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे ज्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या बंदने दबलेल्या लोकांनी लढण्याचा संदेश दिला आहे, कदाचित तुम्हाला समजले नसेल.

दुसरीकडे, राजस्थानमध्ये विरोध करण्याच्या प्रश्नावर नवाब मलिक म्हणाले की आमचा पक्ष तिथे नाही, मग अँकर म्हणाले की तुमचा पक्ष उत्तर प्रदेशमध्येही नाही. या प्रश्नावर नवाब मलिक गोंधळून गेले. ते म्हणाले की आंदोलन करायचे की नाही हे पक्ष ठरवेल. आणि आम्ही कुठे आहोत, हा प्रश्न विचारू नका. असे म्हणत नवाब मलिक यांनी आपला माईक काढला आणि मुलाखत सोडून निघून गेले.

महत्त्वाच्या बातम्या