Share

Rutuja Latake । “तुम्ही लटकेंचा राजीनामा स्वीकारताय की नाही ते सांगा”; हायकोर्टाचा बीएमसी आयुक्तांना इशारा

मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीबाबत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र मुंबई महापालिकेने त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही तर त्यांना निवडणूक लढवता येणार नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर आहे. ऋतुजा लटके यांचा राजीनामा न स्विकारण्यामागे भाजपचा डाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजपने महापालिका प्रशासनाला आदेश दिल्यामुळे  ऋतुजा लटके यांचा राजीनामा होल्डवर ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

उमेदवारी जाहीर झालेल्या ऋतुजा लटके यांच्या मुंबई महानगरपालिकेविरोधातील याचिकेवर गुरुवारी दुपारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्ती नितीन जमादार यांच्या खंडपीठाने पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना उत्तर देण्यासाठी तासाभराचा अवधी दिला आहे. राजीनामा स्वीकारत आहात किंवा नाही, ते दुपारी २.३० वाजता सांगा, असे निर्देश उच्च न्यायालयाकडून देण्यात आले. त्यामुळे आता यावर इकलाब सिंह चहल काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागेलेलं आहे.

ऋतुजा लटके यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्यांचा राजीनामा स्वीकारण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती केली आहे. याप्रकरणी आज (गुरुवार) न्यायालयात सुनावणी होणार आहे. शिवसेनेचे आमदार अनिल परब म्हणाले की, “शिंदे गटाकडून  ऋतुजा लटके यांच्यावर निवडणूक लढवण्यासाठी दबाव आणला जात आहे. त्यांना मंत्रीपद देण्याची ऑफर असल्याचेही आम्ही ऐकले आहे. एक महिना झाला तरी त्यांचा राजीनामा स्विकारण्यात आला नाही.

महापालिका आयुक्त आणि सामान्य प्रशासन विभागाकडून अद्यापही तो मंजूर करण्यात आलेला नाही. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटकेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आज यावर सुनावणी आहे. ऋतुजा लटके यांना राजीनामा मंजूर झाला नाही, तर त्यांना निवडणूक लढविता येणार नाही.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीबाबत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now