मुंबई : दिवसेंदिवस महागाई प्रचंड वाढत आहे. या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून इंधनाच्या किंमती वाढत आहेत. आता गॅस सिलिंडरच्या दरातही प्रचंड वाढ केली आहे. अशातच गॅस सिलिंडर महागाईवरील नरेंद्र मोदींचा जुना व्हिडीओ व्हाईरल होत आहे.
हा व्हिडीओ फेसबुकवर कॉंग्रेसने ‘यापुढे मतदान करताना मोदींचा हा सल्ला जरूर लक्षात ठेवा’ असे कॅप्शन देत टोला लगावला आहे. “तुम्ही मतदान करायला जाताना घरात जो गॅस सिलिंडर आहे, त्याला नमस्कार करून जावा. गॅस सिलिंडर या लोकांनी हिसकावून घेतले आहेत. गॅस सिलिंडर प्रचंड महाग केले आहेत” असे या व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदी बोलत असताना दिसत आहेत.
२२ मार्चपासून सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत आहे. तर, विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. आज घरगुती सिलिंडरची किंमत मुंबईत ९९९.५० इतकी आहे. तर, दिल्लीत ९९९.५० रुपये आहे.
महत्वाच्या बातम्या –