‘तोंड दिलंय त्यामुळे काहीही बोला’, भातखळकरांचा पवारांवर निशाना

‘तोंड दिलंय त्यामुळे काहीही बोला’, भातखळकरांचा पवारांवर निशाना

atul bhatkhalkar

मुंबई: केंद्र सरकारकडून कारखानदारी धोरण संपवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशा कामगाराविरोधात धोरण आखणाऱ्या भाजप सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. दिल्लीपासून गल्लीपर्यंत केवळ लुट करण्याचे काम सुरु आहे. अशा लुट करणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला करावे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली होती. आता यावरच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.

‘जनतेच्या आशीर्वादाने निवडून आलेल्या ३०३ खासदारांचे भाजपचे केंद्र सरकार खड्यासारखे दूर करा हे ४ खासदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सांगू शकतात ही भारतीय संसदीय लोकशाहीची खासियत आहे. तोंड दिलंय त्यामुळे काहीही बोला’. अशी खोचक टीका अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत केली आहे.

दरम्यान भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या चांगलीच खडाजंगी दिसून येत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. यावरच महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांनी भाजपला सडेतोड उत्तर दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या