बोगस केस तयार करून साध्वीला अडकवले,शहांंनी केला साध्वीचा बचाव

amit shah

टीम महाराष्ट्र देशा – मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले एटीएसचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वादात सापडलेली मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरटीकेची धनी बनली आहे. साध्वीवर चौफेर टीका होत असताना भाजप अध्यक्ष अमित शहा मात्र साध्वीच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत.

साध्वीवर खोटे आरोप करून तिला बोगस प्रकरणात अडकवण्यात आलं, असं म्हणत शहा यांनी साध्वीची पाठराखण केली आहे. कोलकातामध्ये साध्वीसंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अमित शहा यांनी साध्वीचा जोरदार बचाव केला.

नेमकं काय म्हणाले अमित शाह ?

साध्वीच्या बाबतीत सांगायचं झालं तर, हिंदू दहशतवादाच्या नावाने एक बोगस केस तयार करण्यात आली. जगात देशाच्या संस्कृतीची बदनामी करण्यात आली. कोर्टात खटला चालल्यानंतर तो बोगस असल्याचं स्पष्ट झालं.समझौता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट करणारे लोक कुठे आहेत? ज्यांना आधी पकडलं होतं, त्यांना सोडलं का?Loading…
Loading...