सावंतांचा राजीनामा, शिंदेंकडे आरोग्य खात्याचा अधिभार!

eknath-shinde

मुंबई : डॉ. दीपक सावंत यांच्या राजीनाम्यानंतर राज्याच्या आरोग्य खात्याचा अधिभार शिवसेना नेते आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. दीपक सावंत यांच्या आमदारकीचा कालावधी संपून 7 जानेवारीला म्हणजेच आज सहा महिने होत असल्याने त्यानंतर ते मंत्रिपदी राहू शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेने विलास पोतनीस यांना उमेदवारी देत सावंत यांना डावलण्यात आलं होतं. विलास पोतनीस हे शिवसेनेचे बोरिवलीचे विभागप्रमुख आहेत. त्यांनी पदवीधर मतदारसंघातून मोठा विजय मिळवला आहे. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या कार्यपद्धतीबाबत शिवसैनिकांमध्ये आणि विशेष करून युवासेनेमध्ये नाराजी होती. त्यामुळे सावंत यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.