सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी झंकारले सरोद-सतारीचे सुर

पुणे : ‘६७व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवा’च्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात संदीप भट्टाचारजी यांचे गायन तर मोरमुकुट व मनोज केडिया या बंधूंचे सतार व सरोद वादन रंगले होते.

दुसऱ्या दिवसाची सुरुवात संदीप भट्टाचारजी यांच्या सुरेल गायनाने झाली. त्यांनी राग मुलतानीने आपल्या गायनाची सुरुवात करत विलंबित एक ताल, द्रुत व मध्यलयीतील तीन ताल यांचे सदरीकरण केले. यावेळी ‘कवन देस गये..’, ‘गगन मुरलिया मोरी रे…’, ‘नैनमे आनबान..’ या रचना पेश केल्या. त्यांनातर राग पूरियाधनाश्री मध्ये ‘खुश रहे सनम मेरा…’ ही बंदिश सादर केली. ‘बाजे रे मुरलिया बाजे…’ या भजनाने त्यांनी आपल्या मैफलीला विराम दिला. त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), अनुजा भावे क्षीरसागर व वैशाली कुबेर (तानपुरा), माऊली टकाळकर (टाळ) यांनी साथसंगत केली.

त्यानंतर मोरमुकुट व मनोज केडिया या बंधूंचे सतार व सरोद वादन रंगले. त्यांनी राग झिंजोटीने आपल्या वादनास सुरुवात केली. “जहा स्वर हे वही ईश्वर है.” असे म्हणत त्यांनी स्वरमंचाला अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी राग मिश्रबिरू पेश केला. त्यांना सत्यजित तळवलकर यांनी तबल्याची साथसंगत केली.

महत्वाच्या बातम्या