मुंबई : सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ३ जानेवारी १८३१ रोजी सावित्रीबाई फुले(Savitribai Phule) यांचा जन्म झाला. भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. यानिमित्ताने सर्व स्तराहून सावित्रीबाईंना अभिवादन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे(Amol Kolhe) यांनी ट्विटच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहिली आहे.
ट्विटमध्ये अमोल कोल्हे म्हणाले आहेत की,’क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचे संपूर्ण आयुष्य दीपस्तंभाप्रमाणे असंख्य पिढ्यांना मार्गदर्शन करीत आहे. युगायुगांच्या बेड्या तोडणाऱ्या त्या रणरागिणी होत्या. हातात खडू घेऊन क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या सोबत त्यांनी शिक्षणाची ज्योत प्रज्वलित केली.’
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचे संपूर्ण आयुष्य दीपस्तंभाप्रमाणे असंख्य पिढ्यांना मार्गदर्शन करीत आहे. युगायुगांच्या बेड्या तोडणाऱ्या त्या रणरागिणी होत्या. हातात खडू घेऊन क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या सोबत त्यांनी शिक्षणाची ज्योत प्रज्वलित केली. pic.twitter.com/FmVkoSKHSH
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) January 3, 2022
दरम्यान, त्यांचे हे कार्य युगप्रवर्तक आहे. त्यांच्या योगदानास वंदन करण्यासाठी सावित्रीमाई फुले यांचा जन्मदिवस ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. सावित्रीबाईंच्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा जागर करुयात. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन,असे कोल्हे ट्विटमध्ये म्हणाले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘एकमेकाला ओरबाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजाला सावित्रीबाईंनी सत्कार्याचा आदर्श घालून दिला’
- पहिल्या किसान रेल्वेच्या उद्घाटन कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन
- ओमायक्रॉनबाबत दिलासादायक बातमी; जाणून घ्या काय म्हणाले AIIMS चे संचालक
- मराठवाड्यातील जनतेला नववर्षाच्या सुरुवातीला रावसाहेब दानवेंनी दिले ‘हे’ गिफ्ट..!
- ‘सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबई”करां”ची आठवण झाली’; आशिष शेलारांची टीका
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<