क्रांतीज्योती सावित्रीमाईंच्या जयंतीदिनी शाळेची धुरा मुलींच्या हाती !

blank

टीम महाराष्ट्र देशा: आज बूधवार रोजी जिल्हा परिषद प्रा.शा.वडीकाळ्या येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले जयंती निमीत्त स्वयंशासनदिन हा आगळा वेगळा ऊपक्रम ऊत्साहात पार पडला.

दैनंदिन परिपाठापासून शाळा सूटण्यापर्यंतचे सर्व नियोजन,व्यवस्थान शाळेतील विद्यार्थी शिक्षक-शिक्षिकांनी अतिशय ऊत्कृष्टरित्या पार पाडले.माधूरी गव्हाणे हिने मु.अ ची भूमिका निभावली तर सहशिक्षक / शिक्षीका म्हणून सिता काळे,वैष्णवी मते,लक्ष्मी थोरात,आरती घोलप,कोमल मते,मयूरी जंगले,मयूरी गिरी,अर्चना कळकटे,स्वाती कळकटे,शितल राठोड, अंजना चव्हाण,शिवकन्या थोरात,विलास थोरात,नितीन खरात,किशोर ढेबे,गोरख ढेबे,आदित्य मोताळे, दादासाहेब बन,सूरज मूळे, आणि शिपायाची भूमिका शिवराज मिरकड याने निभावली.

blank

विद्यार्थी शिक्षकांचे मूल्यापन करून त्यांना पारितोषिकही देण्यात आले. विद्यार्थी शिक्षकांचे परिक्षण करण्याची जबाबदारी केंद्रातील शिक्षक के.प्र.श्री.सुभाष हर्षे सर,गवंडगावे सर यानी पार पाडली.

कार्यक्रमाचा समारोप क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले जयंती निमीत्त आयोजीत समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून केंद्रप्रमूख श्री आरसूळ सर तर प्रमूख पाहूणे म्हणून मू.अ माने सर ऊपस्थीत होते यांच्या हस्ते बक्षीस वितरणाने कायक्रमाचा समारोप झाला.यावेळी आरसूळ सरांनी मनोगत करतांना विद्यार्थ्यांचे कौतूक केले तसेच आदर्श शिक्षकविद्यार्थ्यांची नावे घोषीत केले,माधूरी गव्हाणे,पृथ्वीराज मते,वैष्णवी मते ई विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

स्वयंशासनदिन यशस्वी करण्यासाठी भोसले सर,खेडकर सर,माकोडे सर,लंगोटे सर,मते सर,शेळके सर,मते सर,सातभद्रे मॅडम,फाटक सर,पाष्टे सर आदिंनी परिश्रम घेतले.

blank