परीक्षा विभागाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह ?

पुणे : विद्यपीठाच्या परीक्षा विभागाने एमआय टी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला हजर असून देखील निकालात गैरहजर दाखवल्यावल्याचे प्रकरण ताजे असतांनाच असाच प्रकार खेड शिवापूर येथील
आयोजन स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये घडला आहे.

कॉलेजच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या चक्क 140 विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये काही विषयांमध्ये गैरहजर दाखवण्यात आले आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातिल परीक्षा विभागाचा भोँगळ कारभार समोर आला आहे. विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची मदत न करता. परीक्षा विभागातील अधिकारी कामचुकार पणा करतात. विशेषकरून परीक्षा व मूल्यमापन विभागाच्या कार्यप्रणालीवरच शंका उपस्थित होत आहे. परीक्षा विभागाच्या कासव गतीच्या कामामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत आहे. गेली पंधरा दिवस विद्यापीठाकडून तारीख पे तारीख देण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परीक्षा विभागाकडूनच चुका होत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी अपेक्षा तरी कोणाकडून करावी. विद्यार्थ्यांच्या करीयर शी खेळण्याचा प्रकार विद्यापीठासाठी काही नवीन नाही. अशे मत विद्यार्थ्यांनी वक्त केले. सदर प्रकरणा बाबत अल्तिमेट देऊनही कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी कोणतीच ठोस उपाययोजना न केल्यास विद्यापीठात उपोषणाला सुरूवात करण्यात येईल, असे जनता दल युनायटेडचे प्रदेश सरचिटणीस कुलदीप आंबेकर याने सांगितले.