fbpx

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहात विद्यार्थ्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडलीये. ऋषिकेश संजय आहेर असं या विद्यार्थ्याचे नाव आहे.

विद्यापीठामधील वसतिगृह क्रमांक ८ मध्ये त्याचा ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. ऋषिकेश नगर जिल्ह्यातील घरगाव येथे राहणारा होता. पुणे विद्यापीठात तो एम कॉमच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता. सकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास त्याला चक्कर आली. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथे त्याचा दुर्देवी मृत्यू झाला.