fbpx

बुद्धी असुनी चालत नाही,तयास मानव म्हणावे का ?

टीम महाराष्ट्र देशा : देशातील प्रथम महिला शिक्षिका, कवयित्री, समाजसुधारिका, क्रांतिकारी सावित्रीबाई फुले यांचा आज स्मृतिदिन आहे. राज्यभरात अनेक प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करून सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहण्यात येत आहे.

सावित्रीबाईंचे जीवन म्हणजे संघर्ष!
सावित्रीबाई यांचा वयाच्या केवळ 9 व्या वर्षी १३ वर्षीय ज्योतीबा फुले यांच्याशी विवाह झाला. त्या काळात स्त्रियांचे चूल आणि मुलं एवढेच काय ते विश्व होते. जोपर्यंत घरातील स्त्री शिकणार नाही तोपर्यंत समाजामध्ये प्रगती होणारी नाही हे ज्योतीरावांना उमगले होते. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या पत्नीला म्हणजे सावित्रीबाईना शिक्षण दिले. त्यानंतर फुले दाम्पत्यांनी मिळून आपल्या ज्ञानाचा उपयोग स्त्री शिक्षणासाठी आणि समाजसुधारणेसाठी करण्याचे ठरवले. १८५२ मध्ये पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा काढली. समजातील नाहक रूढी परंपरा, जातीवाद, स्त्री-पुरुष समानता यांसारख्या अनेक गंभीर समस्यांना तोंड देत त्यांनी आपले आयुष्य समजासाठी खर्च केले.

“ज्ञान नाही विद्या नाही,
ते घेनेची गोडी नाही,
बुद्धी असुनी चालत नाही,
तयास मानव म्हणावे का ?”

या त्यांच्या तयास मानव म्हणावे का ? कवितेप्रमाणे त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य हे शिक्षणासाठी खर्च केले.

वर्षानुवर्षे स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या समाजाशी लढून 18 व्या शतकात स्त्री शिक्षणाचा पाया रचून समाजामध्ये क्रांती घडविण्यात सावित्रीबाई यांचा सिंहाचा वाटा आहे.असे म्हटले जाते की, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्री चा हात असतो. परंतु सावित्रीबाई यांना समाजक्रांतीच्या या कार्यामध्ये त्यांना त्यांच्या पतीची म्हणजे महात्मा ज्योतीराव फुले यांची साथ मिळाली. आपल्या पत्नीला त्यांनी स्वतः लिहायला-वाचायला शिकवले. त्यांच्या प्रत्येक अडचणीत ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यामुळे लाखो अडचणींना सामोरे जात असताना त्या कधी खचल्या नाहीत. केवळ चार भिंतीपुरते स्त्रियांचे विश्व आज मर्यादित राहिलेले नाही.आज प्रत्येक क्षेत्रामध्ये ‘स्त्री’ ही पुरुषाच्या खांद्याला खांदा मिळवत आपले कर्तुत्व सिद्ध करत आहे ते केवळ सावित्रीबाई यांनी केलेल्या संघर्षामुळेच!

सावित्रीबाई यांनी आपल्यासाठी केलेल्या संघर्षाचे स्मरण ठेवून समाजक्रांती घडवण्यात हातभार लावणे हिच त्यांना खरे आदरांजली ठरेल.

3 Comments

Click here to post a comment