विद्यापीठ सिनेट निवडणुकित होणार तिरंगी लढत

savitribai fule pune university१

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पदवीधर अभिसभा (सिनेट) निवडणुक काही दिवसावर येऊन ठेपली आहे.त्यामुळे सर्व विद्यार्थी संघटना सक्रिय असून नवीन पैनल ची उभारणी केली आहे. विद्यापीठ कायद्यात बदल झाल्यानंतर यावर्षी सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठात नवीन बदलासह निवडणूक होणार आहे. त्यामुळे विद्यापीठ परिसरात राजकीय चर्चेला चांगलाच रंग आला आहे.

एकूण १६ जागेसाठी निवडणुक होणार असून यापूर्वी विद्यापिठात दोन पैनल सक्रिय असायच्या त्यामधे विद्यार्थी विकास मंच आणि एकता पैनल अशी लढत असायची. यावर्षी विद्यापीठ राजकारणात तीसरी पैनल उभी झाली आहे. विद्यापीठातील जयकर ग्रंथालयातील माजी विद्यार्थ्यांनी मिळून जयकर ग्रूप परिवर्तन पैनल ची उभारणी केलीे. त्यामुळे विद्यापीठ राजकारणात यावर्षी तिरंगी लढत पहायला मिळणार आहे. व्हाटसप, फ़ेसबुक च्या माध्यमांतून प्रचाराला सुरवात देखील झाली आहे. तसेच सध्या रोचेकिंग घोटाळा , सेट विद्यार्थी प्रकरण विद्यापीठाचा भोँगळ कारभार दिसून येत. या विरोधात सर्व विद्यार्थी संघटना एकटवल्या आहेत. त्यामुळे तापलेल्या वातावरणात निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे.