सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा कॅम्पस जम्मू-काश्मिरात?

पुणे : काश्मीरमधील बदलत्या परिस्थितीमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला काश्मीरमध्ये शैक्षणिक केंद्र-संकुल सुरू करता यावे. यासाठी विशेष बाब म्हणून परवानगी मागणारा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवायचा निर्णय काल पुण्यात विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत झाला. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांनी मांडलेला हा प्रस्ताव या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला.

जम्मू काश्मिरमधील कलम ३७० हटवल्यानंतर तेथील नियम शिथिल झाले आहे. तेथे महाविद्यालय सुरू करण्यासाठी खासगी शैक्षणिक संस्था उत्सुक आहेत. या पार्श्वमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानेही जम्मू काश्मीरमध्ये शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने या संदर्भातील ठराव संमत केला असून, आता राज्य सरकारकडे मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवला जाणार आहे.

Loading...

दरम्यान, काश्‍मीर खोऱ्यात विशेषत: पर्यटन क्षेत्र सुधारण्यास मोठी संधी आहे. तसेच तेथे सफरचंद मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असते. त्याला अनुसरून काही कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम तेथील शिक्षण संस्थांच्या सहकार्याने सुरू करण्याच्या पुणे विद्यापीठ विचारात आहे.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
इंदुरीकर महाराज तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका : रुपाली पाटील- ठोंबरे
जगात शिवसेनेएवढे 'नीच' राजकारण कोणीच करू शकत नाही
'आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचा दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन'
मी 'गमतीजमती' सुरु केल्या तर, तुमच्या मदतीलाही कोणी येणार नाही : अजित पवार
इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य दुर्दैवी : खासदार सुप्रिया सुळे
तृप्ती देसाईंवर अश्लील टीका करणाऱ्यांचा किशोरी शहाणेंनी  घेतला समाचार
इंदुरीकर महाराज तुम्ही कीर्तन सोडू नका,संयम ठेवा,अवघा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे : बानगुडे पाटील
आता 'यां'नीही केला CAA आणि NRC ला विरोध, शरद पवारांची घेतली भेट