सेट परीक्षार्थींचे आमरण उपोषण

set studant in pune univercity

पुणे : सावित्राबाई फुले विद्यापीठाकडे जबाबदारी असलेल्या सेट परीक्षेचा निकाल काही दिवसापुर्वी जाहीर झाला. त्यामध्ये एकूण २५०० विद्यार्थ्यांना विद्यापीठाने पात्र असून सुद्धा अपात्र दाखवले आहे. विद्यार्थ्यांनी सतत निवेदन देऊनही विद्यापीठाने कोणतेही दखल घेतली नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थी आज विद्यापीठाच्या मुख्य गेट समोर उपोषणाला बसले आहेत.
विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका म्हणून ओएमआर शीट देण्यात आल्या होत्या. त्यावर बैठक , सांकेतांक क्रमांक शाईने गडद करून भरायचा असतो मात्र काही विद्यार्थ्यांकडून ही माहिती भरण्यास गफलत झाली. त्यामुळे विद्यापीठातील मशीन क्रमांक रीड करीत नसल्याचे विद्यीठाकडून सांगण्यात आले. तसेच परीक्षेत पात्र असलेल्या विद्यार्थ्यांकडून सुद्धा ओएमआर शीट क्रमांक टाकताना चूक झाली आहे तर ते पात्र कसे असा प्रश्न उपोषणास बसलेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित केला आहे. सदर विद्यार्थ्यांसोबत उपोषणाला बसलेले जनता दल युनायटेड चे प्रदेश सरचिटणीस कुलदीप आंबेकर म्हणाले, कुलगुरूना सतत निवेदन देऊन सुद्धा दखल घेतली नाही. जोपर्यंत विद्यापीठ प्रशासन निर्णय घेत नाही तोपर्यंत उपोषण सुरु ठेवण्यात येणार आहे.