मुंबई : राज्यात सोनसाखळी चोरीचे अनेक प्रकार समोर आले. यातच आता ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या बाबत देखील सोनसाखळी चोरीचा प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे. सविता मालपेकर यांच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरीला गेली होती. दादरमधील शिवाजी पार्क येथे चालत असताना एका चोराने त्यांची चैन खेचली.
त्यानंतर सविता यांनी त्वरीत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याची तक्रार केली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी याची दखल घेतली आणि 24 तासांच्या आत या चोरांना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले. यामुळे सविता मालपेकर यांनी मुंबई पोलिसांचे आभार व्यक्त केले आहे.
दादरमधील शिवाजी पार्क येथे रात्री नऊच्या सुमारास गेट क्रमांक पाचवर फेरी मारून झाल्यानंतर सविता कट्ट्यावर आराम करत बसल्या असत्या, एका व्यक्तीनं त्यांना वेळ विचारली. मात्र त्यांच्या हातात घड्याळ नसल्यामुळे त्यांनी वेळ सांगितली नाही. मात्र त्यांच्यासोबत संभाषण करत असतानाच एक व्यक्ती बाईकवरून आला आणि त्यांची चैन हिसकावून फरार झाला.
या सोनसाखळीच्या किंमत साधारण एक लाख 20 हजार असून, ती 30 ग्रॅम वजनाची आहे. या घटनेनंतर पाच मिनिटांत पोलिस घटनास्थळी पोहोचले. राजा बढे चौकातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याची ओळख पटली तो माहीमचा निवासी असल्याचे यातून समोर आले.
महत्त्वाच्या बातम्या
- शुभमन गील नंतर टीम इंडियाचा ‘हा’ खेळाडू जखमी, इंग्लंड दौऱ्यातुन बाहेर
- ग्रामीण भाग कोरोना मुक्तीकडे; आठवड्याभरात तीन तालुक्यात शुन्य रुग्ण संख्या
- बरं झालं स्वामी बोलले, आम्ही बोललो असतो तर राष्ट्रद्रोह झाला असता – ठाकूर
- ‘१२ आमदारांच्या नियुक्त्या का केल्या नाहीत?’, हायकोर्टाच्या प्रश्नांमुळे राज्यपालांची कोंडी
- माध्यम विश्वात खळबळ! ‘दैनिक भास्कर’ समुहाच्या कार्यालयावर आयकर विभागाची धाड
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<