मुंबईत संविधान बचाव रॅलीला परवानगी नाकारली

राज्य सरकारच्या दबावापोटी निर्णय घेतल्याचा आरोप

मुंबई : शेतकरी नेते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या संकल्पनेतून येत्या २६ जानेवारी रोजी मुंबईत संविधान बचाव रॅली काढण्याच्या निर्णयाला मुंबई पोर्ट ट्रस्टने परवानगी नाकारली आहे.

या संविधान रॅलीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, डाव्या संघटनांनी एकत्र येत संविधान बचाव रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. या रॅलीत शरद पवार यांच्यासह शरद यादव, फारुख अब्दुल्ला, सीताराम येचुरी, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर यांच्यासह काँग्रेसचेही बडे नेते सहभागी होणार आहेत. या रॅलीला प्रत्युत्तर म्हणून प्रत्येक जिल्ह्यात तिरंगा यात्रा काढण्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली होती.

प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्य सरकारने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामुळे संविधान बचाव रॅलीला परवानगी देता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. संविधान बचाव रॅलीला परवानगी नाकारल्यामुळे संविधान नवाब मलिक यांनी संताप व्यक्त करत हा निर्णय राज्य सरकारच्या दबावापोटी घेतला गेला आहे. लोकांना पर्यटनासाठी तेथे जाता येते पण संविधान वाचविण्यासाठी जाण्यास परवानगी नाकारण्यात येत आहे. हे सरकार घटना बदलायला निघालेच आहे. पण, घटनेने लोकशाही मार्गाने विरोध करण्याचा दिलेला अधिकारही नाकारत आहे.