पंतप्रधानांनी एक-एक करत सर्व भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात सामावून घेतले आहे- कन्हैया कुमार

KANHAIYAKUMAR mhd

टीम महाराष्ट्र देशा – रऑंल इंडिया स्टुडन्ट फेडरेशनचे अध्यक्ष कन्हैया कुमार यांची सभा सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास झाली. सभेची सुरुवात संविधानाची प्रस्तावना वाचून करण्यात आली. भारतीय युवकांपुढील आव्हाने या विषयावर बोलतांना कन्हैया कुमार म्हणाले, मराठी समजते पण बोलता येत नाही असे शब्द उच्चारत सभेला सुरुवात केली.

देशद्रोहीच्या आरोपांवर बोलतांना कन्हैया कुमार म्हणाले की, १८ राज्ये तुमची, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती तुमचे, पंतप्रधान तुमचे, राज्यातले सरकार तुमचे मग आजवर माझ्यावर चार्जशीट का दाखल केले नाही. असा सवाल कन्हैया कुमारने उपस्थित केला. तसेच आमची लढाई विचारांशी असल्याचे त्याने सांगितले.सुरुवातीला संविधान जागर सभेत आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांना आणि यवतमाळ येथे औषध फवारणीत मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना आदरांजली वाहण्यात आली.

या सभेचे आयोजन छात्रभारतीसह दहा संघटनांनी कन्हैया कुमार यांच्या सभेचे आयोजन केले आहे.नाशिकची टोपी घालून कन्हैया कुमारचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर राजू देसले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ते म्हणाले, अभिव्यक्ती स्वातंत्र्यवरील कन्हैया कुमारचे विचार ऐकण्यासाठी अनेक विरोध झाल्याचे ते म्हणाले. या सभेला जाऊ नये म्हणून बॅनर फाडले गेले, सभेला काही लोकांकडून विरोध परंतु नाशिककर ही सभा होण्यासाठी आग्रही राहिले नाशिककरांनी दिलेल्या प्रतीसादाबद्दल त्यांनी आभार मानले.

आमची लढाई ही विचारांची लढाई, सिद्धांताची लढाई, आम्हाला कुणाचे प्रमाणपत्र नकोय आम्ही भगतसिंगचे विचार मानतो. नोटबंदीचा सर्वसामान्य नागरिकांना फटका…विजय मल्ल्या पळून जाण्यात मात्र यशस्वी. भ्रष्टाचार निपटारा करणाऱ्या पंतप्रधानांनी एक-एक करत सर्व भ्रष्टाचारांना पक्षात सामावून घेतले आहे. मुकुलकुमार हे त्यांचे उदाहरण म्हणता येईल.

रस्ते कंपन्यांना बनवायला दिली तर तिथे टोल लागतो नंतर वर्षानुवर्षे टोलच्या नावाखाली नागरिकांची लुट होत असते. राजकारण विनाकारण बदनाम केले जात आहे. १९ वेळा १६ महिन्यात घरगुती इंधनाचे दर वाढविण्यात आले. जर तीन लाख कोटी काळे धन तुम्ही आणले तर जपानहून एक लाख कोटींचे कर्ज घेऊन बुलेट ट्रेन आणण्याची गरज काय? गरीब लोक प्रवास करू शकतील अशी ट्रेन आणा.रोहित वेमुलाच्या आईला अजून न्याय का नाही मिळाला? महिलांवरील अत्याचार का नाही थांबत?शेतकरी आत्महत्या का थांबत नाहीत हेच वर्तमानाचे प्रश्न आहेत…कुठे मंदिर व्हावे हा वर्तमानाचा प्रश्न नाही. या देशात समानता आणावी लागेल केवळ सामजिक, राजनैतिक नाही तर सांस्कृतिक सुद्धा