‘शिक्षण बचाव’ पदयात्रेला सुरुवात

देवळाली प्रवरा : शिक्षण व्यवस्था सुरळीत व्हावी आदी अनेक मागण्यासाठी पुण्यातील भिडेवाडा ते शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या मुंबईतील निवासस्थानापर्यंत पुणे विभागाचे शिक्षक आ. दत्तात्रय सावंत, अमरावती विभागाचे शिक्षक आ. श्रीकांत देशपांडे व पुणे विभागाचे माजी शिक्षण संचालक श्री. ज. मो. अभ्यंकर यांच्या नेतृत्वाखाली “शिक्षण बचाव पदयात्रे चे” आयोजन करण्यात आले आहे.नुकताच या पदयात्रेचा प्रारंभ पुण्यातील भिडे वाड्यापासून झाला

महाराष्ट्र राज्यातील शिक्षण क्षेत्राचा  बोजवारा उडाला आहे व भाजप-शिवसेना सरकारने सत्तेवर आल्यापासून शिक्षणा बाबत रोज नवीन नियम काढत असून प्रचलित नियमांची पायमल्ली होत आहे. नवीन नियम आणताना कोणताही अभ्यास केलेला दिसत नाही, माध्यमिक शाळेतील मुलांना संगणक शिक्षण देणार्‍या व आजच्या संगणक युगात पिढी घडणार्‍या कंत्राटी शिक्षकांना कायम स्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे, हे शासन भावनाहीन असून शिक्षकांचा सन्मान करण्या एवजी अपमान करीत आहे असे मत कॉ. शरद संसारे यांनी महाराष्ट्र देशाबरोब बोलताना व्यक्त केले.

या पदयात्रेत महाराष्ट्रातील सर्व श्रमिक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष व देवळाली प्रवरा चे सुपुत्र कॉ. शरद संसारे व संघटनेचे सचिव कॉ. जिवन सुरूडे आदी मान्यवर महाराष्ट्रातील सर्व कंत्राटी संगणक शिक्षकांना कायम स्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे या मागणीसाठी या यात्रेत सामील झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी संगणक शिक्षकांना कायम स्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे यासाठी कॉ. शरद संसारे यांच्या नेतृत्वाखाली शासन दरबारी लढा चालू आहे मंत्रालय व आझाद मैदान मुंबई येथे अनेक आंदोलने व मोर्चे झाले शासनाला जाग यावी व मागण्या मान्य कराव्यात यासाठी शिक्षण बचाव पदयात्रे चे आयोजन करण्यात आले आहे या यात्रेत शिक्षक आमदारसह अनेक संगणक व इतर शिक्षक सामील झाले आहेत.