आरोग्य सांभाळण्याइतकेच गोरक्षण अभियान गरजेचे!

सोलापूर :  गोरक्षण अभियान गरजेचे आहे. स्वत:चे आरोग्य सांभाळण्यासाठी मांसाहार सोडल्यास गाईचे आपोआप रक्षण होईल. विविध प्रकारचा मांसाहार करून पोटाची स्मशानभूमी करू नका. शाकाहारी जेवण केल्यास आजार दूर होण्यास मदत होते. आजारापासून दूर राहण्यासाठी शाकाहाराचा आग्रह धरा, असे आवाहन टाटा कॅन्सर रुग्णालयाचे शास्त्रज्ञ डॉ. नवनाथ दुधाळ यांनी केले. पीपल फॉर अॅनिमल वेल्फेअर, जिल्हा गोसेवा विभाग, स्वदेशी पंचगव्य गुरुकुलम संशोधन केंद्रातर्फे आयोजित आरोग्य शिबिर मोफत नाडी तपासणी शिबिरात ते बोलत होते. या शिबिराचा १९० रुग्णांनी लाभ घेतला. डाॅ. दुधाळ म्हणाले, कॅन्सरला रोखण्यासाठी पंचगव्य हा एकमेव पर्याय आहे. कारण व्यसन करणाऱ्यांनाही सध्या कॅन्सर होत आहे. बाजारपेठेत विक्रीसाठी येणारी प्रत्येक वस्तू ही केमिकलशिवाय तयार होत नाही. त्यासाठी शेतातही जैविक खताचा वापर करावा. आजारापासून बचावासाठी दिनक्रम जीवनशैलीत बदल करण्याची गरज आहे. फूड सेफ्टी सेक्युरिटी प्रदूषण नियंत्रणाचे कायदे आहेत. त्यांची काटेकाेर अंमलबजावणी केल्यास अडचण होत नाही. परंतु, भ्रष्ट अधिकारयामुळे नुकसान होत आहे. डॉ. स्नेहा होनराव, शुभम साठे, अविनाश हजारे, शिवानंद कल्लुरकर उपस्थित होते.