‘असा’ झाला आधारचा हेल्पलाइन क्रमांक लाखो स्मार्टफोनधारकांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह

नवी दिल्ली – देशभरातील लाखो स्मार्टफोनधारकांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये (फोनबुक) शुक्रवारी (3 ऑगस्ट) आधारचा हेल्पलाइन क्रमांक 18003001947 UIDAI या नावानं आपोआप सेव्ह झाला होता. यामुळे अनेकांना धक्का बसला. कुणी याला सायबर हल्ला म्हणत होत तर कुणी प्रायव्हेसी वर आक्रमण असल्याचं सांगण्यात येत होत मात्र या प्रकरणात गुगलची चूक असल्याची माहिती समोर आली आहे. खुद्द गुगलनं या प्रकरणी आपली चूक मान्य करत जाहीर माफी मागितली आहे. तसंच कोणताही सायबर हल्ला झाला नसल्याचंही स्पष्ट केले आहे.

गुगलचा माफीनामा :
लाखो स्मार्टफोनधारकांना आमच्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला याचा आम्हाला खेद आहे. झालेल्या चुकीबाबत आम्ही माफी मागतो. UIDAI आणि अन्य 112 हेल्पलाईन क्रमांक अॅन्ड्रॉईडच्या सेटअपमध्ये 2014 साली कोड करण्यात आले होते, अशी माहिती इंटरनल सर्व्हेत समोर आली आहे. हा क्रमांक एकदा ग्राहकांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह झाला की डिव्हाईस बदलल्यानंतरही हाच क्रमांक पुन्हा नव्या डिव्हाईसमध्ये सेव्ह होतो. मात्र, तुमचा मोबाईल हॅक झालेला नाही. कोणताही सायबर हल्ला झालेला नाही. UIDAIचा आपोआप सेव्ह झालेला क्रमांक तुम्ही डिलीट करू शकता. नवीन अॅन्ड्रॉईड सेटअपमध्ये हा क्रमांक आपोआप सेव्ह होऊ नये, यासाठी प्रयत्न करणार आहोत.

महाराष्ट्रातील गुन्ह्यांच्या संख्येत घट; अपराध सिद्धीच्या प्रमाणात वाढ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Loading...

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
अर्जुन कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल बोलतांना मोठा खुलासा ...
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
भाजपच्या धास्तीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतले ; सरकारमधील दोन नेत्यांचे राजीनामे
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला