fbpx

‘सावरकरांच्या नशीबी पुन्हा काळे पाणी’ ; ‘भारतरत्न’वरून शिवसेना नेते संजय राऊतांची टीका

टीम महाराष्ट्र देशा : ७० व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी राष्ट्रपती कार्यालयाकडून भारतरत्न पुरस्काराच्या मानकऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली.यामध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, जनसंघाचे नेते नानाजी देशमुख (मरणोत्तर) आणि ज्येष्ठ संगीतकार भुपेन हजारिका (मरणोत्तर) यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात येईल. परंतु केंद्र सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार न दिल्यामुळे शिवसेना नेते संजय राऊत यांनी बोचरी टीका केली आहे.

भारतरत्न पुरस्कारांची घोषणा करण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनी ट्विटरवरून नाराजी व्यक्त केली आहे. राऊत यांनी याबद्दल दोन ट्विट केली आहेत. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हंटले आहे की, भारतरत्न नककी कुणाला? आज नानाजी देशमुख,भुपेश हजारीका आणी प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न बनवले. वीर सावरकरांच्या नशीबी पुन्हा काळे पाणी. शेम शेम. त्यानंतर त्यांनी अजून एक ट्विट केले. त्यात त्यांनी भारतरत्न पुरस्काराच्या सन्मानचिन्हाचा फोटो शेअर करत म्हंटले आहे की, ‘विनायका प्राण तळमळला’.