Share

Tushar Gandhi | “महात्मा गांधींची हत्या करण्यासाठी सावरकरांनी गोडसेला बंदूक पुरवली”; तुषार गांधींचे गंभीर आरोप

Tushar Gandhi | मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यांच्या या विधानामुळे भाजपकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही राहुल गांधींच्या वक्तव्याशी आपण सहमत नसल्याचं सांगितलं आहे. अशातच आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी (Tushar Gandhi) यांनी सावरकरांसंबंधी एक ट्विट केलं आहे. या ट्विटची सर्वत्र चर्चा होत असून यामुळे एक नवीन वाद निर्माण झाला आहे.

“सावरकरांनी फक्त ब्रिटिशांनाच मदत केली नाही, तर नथुराम गोडसेलाही बापूंची हत्या करण्यासाठी एक चांगली बंदूक मिळवून देण्यात मदत केली. बापूंच्या हत्येच्या दोन दिवस आधी गोडसेकडे कोणतंही शस्त्र नव्हतं,” असे आरोप तुषार गांधी यांनी केलेत.

दरम्यान तुषार गांधी (Tushar Gandhi) यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, “मी आरोप करत नाही आहे. मी जे इतिहासात नमूद आहे तेच सांगितलं आहे. पोलिसांच्या एफआयआरमध्ये नोंद आहे त्यानुसार २६,२७ जानेवारी १९४८ च्या सुमारास नथुराम गोडसे आणि विनायक आपटे सावरकरांना भेटले होते. त्या दिवसापर्यंत नथुराम गोडसेकडे बंदूक नव्हती.”

“बंदुकीच्या शोधात तो संपूर्ण मुंबईत फिरत होता. मात्र या भेटीनंतर ते थेट दिल्लीला आणि तेथून ग्वाल्हेरला गेले. ग्वाल्हेरला त्यांनी सावरकवादी असणाऱ्या परचुरेंची भेट घेतली. यानंतर त्यांना सर्वात चांगली पिस्तूल मिळवून दिली.” तसेच बापूंच्या हत्येच्या दोन दिवस आधी हे सर्व घडलं. हेच मी सांगितलं असून, नवीन काही आरोप केलेला नाही”, असं स्पष्टीकरण तुषार गांधी यांनी दिलंय.

महत्वाच्या बातम्या :

Tushar Gandhi | मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलंच …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now