‘महात्मा गांधींच्या सूचनेवरूनच सावरकरांनी दया याचिका दाखल केली’, राजनाथ सिंह यांचा दावा

rajnath singh

मुंबई: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी महात्मा गांधींच्या सूचनेवरून अंदमान तुरुंगात कैद असताना ब्रिटीशांकडे दया याचिका दाखल केली होती. असा दावा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. ते ‘वीर सावरकर: द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन’ या उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी बोलत होते.

आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये सावरकरांवरील पुस्तकाचे प्रकाशन करताना राजनाथ सिंह यांनी हे वक्तव्य केले आहे.या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक सेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचीही उपस्थिती होती. यावेळी मोहन भागवत यांनी म्हटले की, ‘सावरकर कठोरपणे बोलले म्हणून जनतेचा गैरसमज झाला. पण जर संपूर्ण भारत त्यांच्यासारखे बोलला असता तर देशाला फाळणीला सामोरे जावे लागले नसते.’ असे वक्तव्य भागवत यांनी केले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात प्रचंड खोटे बोलले गेले आहे. त्यांनी ब्रिटिश सरकारपुढे अनेक दया याचिका दाखल केल्या हे वारंवार सांगितले गेले. मात्र त्यांनी महात्मा गांधींच्या सूचनेवरूनच दया याचिका दाखल केली असल्याचे विधान राजनाथ सिंह यांनी केले आहे. तसेच देशाच्या सांस्कृतिक एकतेसाठी त्यांचे योगदान दुर्लक्षित केले गेले. २००३ मध्ये सावरकरांचे चित्र संसदेत लावण्यात आले होते तेव्हा बहुतेक राजकीय पक्षांनी त्यावर बहिष्कार टाकला होता, तर सरकार बदलल्यावर अंदमान आणि निकोबार कारागृहात त्यांच्या नावाचा फलक काढून टाकण्यात आला होता. असेही राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या