जे वडिलांच्या पक्षात जावू शकत नाहीत ते दुसऱ्याला ब्रह्मज्ञान सांगतात ; शिवसेनेचा नितेश राणेंवर हल्ला

टीम महाराष्ट्र देशा: जे स्वतःच्या आमदारकीचा राजीनामा देवून वडिलांच्या पक्षात जावू शकत नाहीत ते दुसऱ्याला ब्रह्मज्ञान सांगत सुटले आहेत. असा टोला शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रांत सावंत यांनी आमदार नितेश राणे यांना लगावला आहे. कोल्हापूर येथे झालेली नारायण राणे यांच्या पक्षाची पहिली सभा नितेश राणेंनी गच्चीवरून पाहिली होती यावरून विक्रांत सावंत यांनी नितेश राणेंवर निशाना साधला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याने यापूर्वीच सावंतवाडी व मालवण विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या पारड्यात टाकला असून आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना अरुण दुधवडकर यांच्या नेतृत्वाखाली देवगड मतदारसंघातून नितेश राणे यांची हकालपट्टी करेल अस सुद्धा विक्रांत सावंत यांनी म्हटलं आहे.

You might also like
Comments
Loading...