पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी सौरभ राव; तर नवल किशोर राम जिल्हाधिकारीपदी

पुणे: पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी आपला पदभार सोडून १५ दिवस उलटले तरी नवीन आयुक्तांची नेमणूक करण्यात आली नव्हती, त्यामुळे नवीन आयुक्त कोण असणार याबद्दल चर्चांना उधान आले होते. अखेर पुण्याचे जिल्हाधिकारी असणारे सौरभ राव यांची महापालिका आयुक्तपदावर नेमणूक करण्यात आली आहे. तर नवल किशोर राम जिल्हाधिकारी असणार आहेत.

राज्यशास्त्रामध्ये एमए केलेले सौरभ राव हे २००३ च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. उपजिल्हाधिकारी वर्धा, गोंदिया जिल्हापरिषदेचे सीईओ, जिल्हाधिकारी नागपूर, पुणे अशा वेगवेगळ्या पदांवर राव यांनी काम पाहिलेले आहे. आपल्या बेधडक बोलीमुळे राव हे कायम चर्चेत राहणारे आयएएस अधिकारी म्हणून ओळखले जातात. पुण्याचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक मुख्यमंत्री तसेच प्रधानमंत्री कार्यालयाकडून देखील करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आलेले नवल किशोर राम हे २००८ च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. याआधी त्यांनी यवतमाळ जिल्हापरिषदेचे सीईओ, जिल्हाधिकारी बीड, औरंगाबाद अशा पदांवर काम पाहिले आहे.

You might also like
Comments
Loading...