रामदास आठवलेंवर तात्काळ गुन्हा दाखल करा अन्यथा…

ramdas-athawale

टीम महाराष्ट्र देशा : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अण्णा भाऊंच्या गीतांची विडंबना करुन त्यांच्या साहित्याचा अपमान करीत मातंग समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सत्यशोधक अण्णा भाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आला आहे.

या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथील गृहशाखेचे रावसाहेब दिवान यांना देण्यात आले. यावेळी काशिनाथ सुलाखे पाटील, साहेबराव पाचारणे, नामदेवराव चांदणे, राजू रोकडे, भगवान जगताप, उमेश साठे, संजय चांदणे, नामाभाऊ वाल्हेकर, कडुबाबा लोंढे आदिंसह समाजबांधव उपस्थित होते.

Loading...

महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करण्याचे केंद्रातील मंत्र्यांना शोभत नसून, त्यांना राज्यमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही. आठवले यांची केंद्राच्या राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अन्यथा येणारऱ्या विधानसभा निवडणुकीत मातंग समाजास वेगळा विचार करावा लागणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. अन्यथा मातंग समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मोदी सरकार विरोधात अण्णा हजारे गांधी जयंतीपासून करणार आंदोलन

आरटीआयच्या विरोधात रस्त्यावर उतरा; अण्णा हजारेंचं तरुणांना आवाहन

इतर नेते राजकारणात मस्त, तर सदाभाऊ खोत पूरग्रस्तांच्या बचाव कार्यात व्यस्त

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश
परभणीच्या 'त्या' शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच केला एसएमएस, त्यांनतर जे घडले...
भारताचा 'हा' स्टार गोलंदाज पोलिसी वर्दीत करतोय कोरोनाबाबत जनजागृती
आनंदवार्ता : पुण्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढली, डॉक्टरांवर होतोय कौतुकाचा वर्षाव
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी, 'संध्याकाळपुरते तरी दारुची दुकानं उघडा...'
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
देशातील 10 बँकांचे होणार विलीनीकरण, १ एप्रिलपासून प्रक्रियेला होणार सुरवात
फैसला ऑन दि स्पॉट , संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दादांनी दिला दिलासा
एकही केस नसणाऱ्या आदित्य ठाकरेंना झेड दर्जाची सुरक्षा कशाला ? : निलेश राणे