शिक्षणालयाला बनवले देवालय, फर्ग्युसनमध्ये सत्यनारायणाची ‘महापूजा’

पुणे : विद्येचंं माहेरघर म्हणवल्या जाणाऱ्या पुणे शहरातील नामांकीत फर्ग्युसन महाविद्यालयात सत्यनारायणाची महापूजा घालण्यात आल्याची घटना समोर आली आहे, त्यामुळे शिक्षणालय असणाऱ्या वास्तूला देवालय बनवण्यात आल्याचा आक्षेप विद्यार्थी संघटनांकडून घेण्यात आला आहे.

फर्ग्युसन महाविद्यालयाचे मुख्य कार्यालय असणाऱ्या इमारतीमध्ये ही महापूजा घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे एखाद्या मंदिरापूढे लावण्यात येणाऱ्या पाटीप्रमाणे इथे बोर्ड लावण्यात आला असून, सर्वांनी पूजेच्या तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असं लिहिण्यात आलं आहे.

देश – विदेशातील सर्व जाती धर्माचे विद्यार्थी फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेतात. अस म्हंटल जात की, विद्यालयात सर्व जाती-धर्म एक समान मानले जातात. मात्र, फर्ग्युसनमध्ये घालण्यात आलेल्या महापूजेने कॉलेज प्रशासन धार्मिक रुढीचं उदात्तीकरण करत असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे.

दरम्यान, श्रावण महिन्यात दरवर्षी सत्यनारायण पूजा करण्यात येते, पण यंदाचं काही विद्यार्थी संघटना आक्षेप का घेत आहेत. असा सवाल देखील विचारला जात आहे.

जेष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं निधन

 

You might also like
Comments
Loading...