ही तर महाविद्यालयाची परंपरा, ‘सत्यनारायण’ पूजेवर फर्ग्युसन प्राचार्यांचा दावा

टीम महाराष्ट्र देशा : फर्ग्युसन महाविद्यालयात करण्यात आलेल्या सत्यनारायण पूजेवर काही विद्यार्थी संघटनांकडून आक्षेप घेण्यात आला आहे, अशा प्रकारे पूजा घालत कॉलेज प्रशासन धार्मिक रुढीचं उदात्तीकरण करत असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे. मात्र, दुसरीकडे गेल्या अनेक वर्षांपासून महाविद्यालयात पूजा केली जात आहे, त्यामुळे ही कॉलेजची परंपरा असल्याचा दावा, फर्ग्युसनचे प्राचार्य रवींद्रसिंह परदेशी यांनी केला आहे.

श्रावण महिन्याच्या निमित्ताने फर्ग्युसन महाविद्यालयाचे उप-प्राचार्य यांच्या कार्यालयात सत्यनारायण पूजा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, एखाद्या मंदिरापूढे लावण्यात येणाऱ्या पाटीप्रमाणे इथे बोर्ड लावण्यात आला असून, सर्वांनी पूजेच्या तिर्थप्रासादाचा लाभ घ्यावा असं लिहिण्यात आलं आहे. हा सर्व प्रकार म्हणजे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे.

गेली 30 – 35 वर्षांपासून महाविद्यालयात सत्यनारायण महापूजा केली जाते, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून ही पूजा घालण्यात येते. त्यामुळे आजची पूजा करत आम्ही केवळ परंपरा पाळली असल्याच स्पष्टीकरण, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्रसिंह परदेशी यांनी दिले आहे.

आयएएस अधिकाऱ्याच्या पणतूलाही मागासवर्गीय समजणार का?, सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले