…म्हणून राष्ट्रवादीच्या संग्राम जगतापांचा प्रचार करणे सत्यजित तांबेच्या जिव्हारी

blank

पुणे : विधानसभेला ज्यांच्या विरोधात लढलो, आता त्यांचा प्रचार करण्याची वेळ माझ्यावर आली आहे. असं वक्तव्य करत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. 2014 साली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे संग्राम जगताप विरुद्ध काँग्रेसचे सत्यजित तांबे असा सामना झाला होता.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप आणि इतर मित्रपक्षांच्या युवक आघाडीची बैठक पुण्यामध्ये पार पडली, यावेळी बोलताना सत्यजित तांबे बोलत होते.

ज्यांच्या विरोधात मी विधानसभा लढलो आता त्यांचा प्रचार करणं माझ्या जीवावर आले आले आहे, मात्र तरीही आपण आघाडीचा धर्म पाळणार असून, काहीही करून जगताप यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं तांबे म्हणाले.