fbpx

‘धनुभाऊ तुमच्या राजकीय वजनासोबत शारीरिक वजन देखील वाढो’

टीम महाराष्ट्र देशा : विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांना विविध क्षेत्रातून शुभेच्छा मिळत आहेत. महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनीही त्यांना ट्वीट करून शुभेच्छा दिल्या आहेत.

सत्यजित तांबे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा धनुभाऊ … तुमचे राजकीय आणि शाररीकही वजन ( जे तुम्ही जाणिवपूर्वक कमी करतायेत) वाढत जावो. संघर्षातुन तयार झालेलं तुमचं भारदस्त व्यक्तिमत्वचं मला भावते ! अशा आशयाच ट्वीट करत धनंजय मुंडे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.