fbpx

तुम्ही जुळे नाहीत ‘खुळे’ भाऊ ; सत्यजीत तांबेंची भाजप-सेनेवर टीका

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुका आता जवळ आल्या आहेत. त्यामुळे भाजप-सेनेमध्ये मुख्यमंत्रीपदावरून चढाओढ दिसत आहे. तसेच जागावाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये अद्याप निश्चिती झालेली नाही.

याविषयी शिवसेनेचे खासदार यांनी ‘जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपमध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत. शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपासंदर्भात कोणताही तिढा नाही आणि मुख्यमंत्री पदासाठी कुठलाही वाद नाही. आम्ही जुळ्या भावाप्रमाणे काम करतोय, अस विधान केले आहे. त्यावरून महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी टीका केली आहे. त्यांनी ‘जुळे नाही , खुळे भाऊ …’ अशा शब्दात भाजप सेनेवर टीका केली आहे.