जितिन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशानंतर हनुमानाचे उदाहरण देत सत्यजित तांबेंनी केली खरमरीत टीका

जितीन prasad

मुंबई – माजी केंद्रीय मंत्री राहिलेल्या जितिन प्रसाद यांनी काँग्रेसला धक्का देत आज भाजपात प्रवेश केला. खा. राहुल गांधींचे अत्यंत जवळचे असलेले आणि उत्तर प्रदेशमध्ये मोठी राजकीय ताकद असलेले जितिन यांनी प्रियंका गांधी यांच्यासोबत असलेल्या मतभेदांमुळे काँग्रेस सोडल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीला काही महिने उरले असताना जितिन प्रसाद यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. 2022 मधील उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

जितिन प्रसाद यांच्या भाजपामधील प्रवेशानंतर आता राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. जितिन प्रसाद यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला यानंतर गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबतच्या भेटीचे त्यांचे छायाचित्र व्हायरल झाले आहे. बैठकीच्या ठिकाणी छाती फाडून दाखविणाऱ्या रामभक्त हनुमानाची मूर्ती दिसते आहे. यातील हनुमानाच्या निष्ठेचे उदाहरण देत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी प्रसाद यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

आपल्या हृदयात श्रीराम आहेत, हे दाखवून देण्यासाठी हनुमानाने छाती फाडून दाखविली, अशी अख्यायिका आहे. स्वामीनिष्ठेसाठी हे उदाहरण दिले जाते. शहा यांच्या दालनात अशीच हनुमानाची मूर्ती आहे. त्या मूर्तीसमोरच काँग्रेसशी गद्दारी करून गेलेले जितिन बसले आहेत,अशी टीका तांबे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP