मुंडे प्रकरणावर सत्तार म्हणाले, “प्यार किया तो डरना क्या?”

abdul sattar

जालना : सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. सदर तरुणीने मुंडे यांच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मात्र ”प्यार किया तो डरना क्या” म्हणत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे.

धनंजय मुंडे यांनी स्वत: सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे. दोघांच्या संमतीने असलेल्या प्रेमाची त्यांनी कबुली दिली आहे. या विषयावर बोलताना दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची त्यांनी आठवण काढली. प्यार किया तो डरना क्या? असं बाळासाहेब ठाकरे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना म्हणाले होते, याची आठवण सत्तार यांनी यावेळी करुन दिली.

दरम्यान शपथ पत्रात धनंजय मुंडे यांनी लपवलेल्या माहिती विषयीच्या आरोपावर सत्तार यांनी भाजपच्या अनेक नेत्यांनीही अशी निवडूक आयोगाकडे माहिती लपवली असून योग्य वेळी आपण त्यांची नाव आणि पत्ते जाहीर करु असा इशारा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या