fbpx

कर्नाटकात भाजप ठरणार सर्वात मोठा पक्ष; सट्टे बाजाराचा अंदाज

बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली असून, या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. भाजप आणि काँग्रेससाठी प्रतिष्ठेची असणाऱ्या या निवडणुकीचे अंदाज विविध पोल चाचण्यांनी वर्तवले आहेत. पोल चाचण्यांप्रमाणेच सट्टा बाजारानेही कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा अंदाज वर्तवला आहे.

कर्नाटकात काँटे की टक्कर होणार असून, कुणालाही बहुमत मिळणार नाही. मात्र, भाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल, तर त्यामागोमाग दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस असेल. जेडीएस तिसऱ्या क्रमांकावर राहून किंगमेकरची भूमिका निभावेल, असा अंदाज सट्टा बाजारात वर्तवला जातो आहे.

सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार, कर्नाटकात कुठलाच पक्ष स्वत:च्या हिंमतीवर सरकार बनवू शकत नाही. भाजपला 92-94 जागांवर विजय मिळेल, काँग्रेसला 89-91 जागांवर विजय मिळेल, तर जेडीएसला 32-34 जागांवर विजय मिळेल.