fbpx

‘या’ मराठमोळ्या चेहऱ्याची लागली भाजपच्या संघटन महासचिवपदी वर्णी

टीम महाराष्ट्र देशा- भाजपच्या संघटनमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. सतीश वेलणकर या मराठमोळ्या चेहऱ्याची भाजपचे नवे संघटन महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रामलाल यांच्या जागी सतीश वेलणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विजयवाडा येथे संघाच्या तीन दिवसांच्या बैठकीनंतर शनिवारी हा निर्णय घेण्यात आला . रामलाल यांनी स्वत: आपल्याला या जबाबदारीतून मुक्त करावे अशी विनंती अमित शहांना केली होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. रामलाल हे संघाचे पुर्णवेळ काम पाहणार असून त्यांची राष्ट्रीय स्वंयसेवक संघात अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.