कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीत सतेज पाटील बिनविरोध; अमल महाडिकांची माघार

कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीत सतेज पाटील बिनविरोध; अमल महाडिकांची माघार

Satej Patil And Amal Mahadik

कोल्हापूर : कोल्हापूर विधान परिषदेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं. अखेर कोल्हापूर विधान परिषदेच्या (Kolhapur Legislative Council) जागेवर अखेर काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांची बिनविरोध निवड झाली आहे.

सतेज पाटील यांच्या विरोधातील भाजपचे उमेदवार अमल महाडिक (Amal Mahadik) यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अमल महाडिक आणि शौमिका महाडिक (Shaumika Mahadik) यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.

अमल महाडिक यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी थेट दिल्लीवरुन फोन आल्यानं त्यांनी आपला अर्ज मागे घेतल्याची माहिती मिळत आहे. अमल महाडिक यांना अर्ज मागे घेण्यासाठी दिल्लीतून विरष्ठांनी हा निर्णय घेतला असल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

महत्वाच्या बातम्या: